इस्त्रोनं सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, मोदींचं आवाहन

श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं यशस्वी उड्डाण झालं. पंतप्रधान स्वत: यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय सार्क देशांसाठी सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, असं आवाहनही मोदींनी वैज्ञानिकांना केलं.

Updated: Jun 30, 2014, 02:53 PM IST
इस्त्रोनं सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, मोदींचं आवाहन title=
सौजन्य: डीडी

श्रीहरिकोटा: श्रीहरिकोटामधील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-23चं यशस्वी उड्डाण झालं. पंतप्रधान स्वत: यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय सार्क देशांसाठी सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी, असं आवाहनही मोदींनी वैज्ञानिकांना केलं.

इस्त्रोनं सार्क देशांच्या कल्याणासाठी या सार्क सॅटेलाईट पाठवण्याची मोहीम आखावी. आपल्या शेजारच्या देशांना भारतानं दिलेलं हे गिफ्ट असेल, ज्यामुळं आपण गरिबीशी एकदिलानं लढू, असं मोदी म्हणाले. त्याचबरोबर आपल्या या मोहीमेचं बजेट हे हॉलिवूड फिल्म 'ग्रॅव्हिटी'पेक्षा कमी आहे, ही गोष्ट कौतुकास्पद आहे, असंही मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, उपनिषिदांपासून सुरु झालेली भारतीय संस्कृती उपग्रहांपर्यंत पोहोचली आहे. भारताच्या पूर्वजांनी शून्याचा शोध लावला त्यामुळंच विज्ञान पुढं जावू शकलंय. आपल्या पूर्वजांचे खूप उपकार आहेत. खेड्यापाड्यातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हे वैज्ञानिकांचं खरं काम आहे. खेडी, शहरं आणि महानगरांमध्ये समान्वय यावा, यासाठी अशा मोहीमांची मोठी गरज आहे.

तरुण शास्त्रज्ञांचं मी विशेषत: अभिनंदन करतो आणि नव्या शास्त्रज्ञांचं स्वागत करतो. तरुणांनी संशोधन क्षेत्रात येणं अत्यंत गरजेचं आहे. तरुण शास्त्रज्ञांना पाहून अभिमान वाटतो, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचं कौतुक केलं.सतीश धवन, विक्रम साराभाई यांच्या कार्याला माझा सलाम आहे, असंही मोदी म्हणाले. तसंच मला आज पाच पिढीतल्या वैज्ञानिकांना भेटण्याची संधी मिळाली असंही ते म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.