नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार आहेत आणि कार्ल मार्क्स आणि महात्मा गांधींपेक्षा उत्कृष्ट असल्याचे नव्याने नियुक्त करण्यात आलेले इंडियन कौउंसिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर)चे अध्यघ लोकेश चंद्रा यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधीचे माजी एकनिष्ट आणि संघाकडे कल असलेले लोकेश चंद्रा यांच्या प्रतिक्रीयेने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहे. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली त्यावेळी ते बोलत होते.
मोदी हे गरिबांसाठी देवाचा अवतार आहेत. त्याची जनधन योजना पाहा. कार्ल मार्क्स याने दारिद्र्यावर मोठाले ग्रंथ लिहिले पण त्याचा दारिद्र निर्मूलनात सहभाग काय होता, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
चंद्रा यांनी यापूर्वी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सम्राट अशोकच्या काळातील सांस्कृतिक वैभव पुन्हा मोदी भारताला परत मिळवून देतील.
चंद्रा यांनी आता पर्यंत ५९६ पुस्तक आहेत तसेच त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हे. त्यांना १६ भाषांचे ज्ञान आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.