डोंगरगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रुर्बन मिशन' या नव्या योजनेचा शुभारंभ केला. देशातील ३०० खेड्यांचा या योजनेच्या अंतर्गत कायापालट करण्यात येणार आहे.
खेड्यातील लोकांना अधिक सेवा, सुविधा मिळणे, खेड्यातून शहरांकडे जाणारे स्थलांतर रोकणे, खेड्यामध्ये आरोग्य सेवा पुरवणे या गोष्टींचा या योजनेमध्ये समावेश आहे. भारत देश हा खूप विशाल देश आहे तरी येथे सोयी सुविधांचा अभाव असणे ही चिंताजनक बाब असल्याचे पंतप्रधानांना छत्तीसगडमध्ये म्हटलं आहे.