आई मुलांना जन्म देते आणि गुरु जीवन - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून सॅटेलाईटद्वारे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उद्या (शनिवारी) पाच सप्टेंबरला साजरा होत असलेल्या शिक्षक दिनानिमित्तानं, नरेंद्र मोदी देशभरातून निवडक विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. 

Updated: Sep 4, 2015, 12:39 PM IST
आई मुलांना जन्म देते आणि गुरु जीवन - पंतप्रधान मोदी title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतून सॅटेलाईटद्वारे सध्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उद्या (शनिवारी) पाच सप्टेंबरला साजरा होत असलेल्या शिक्षक दिनानिमित्तानं, नरेंद्र मोदी देशभरातून निवडक विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. 

शनिवारी जन्माष्टमीची सुट्टी असल्यानं देशभरात आजच शिक्षक दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. दिल्लीच्या मानेकशॉ ऑडिटोरियममध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणतात... शिक्षकांची ओळख त्यांच्या विद्यार्थ्यांपासून होते. मुलं घडवण्यामध्ये त्यांच्या आई आणि शिक्षकांचं योगदान असतं. आई मुलांना जन्म देते आणि गुरु जीवन... आजची ही वेळ शिक्षकांचे आभार मानण्याची आहे. 

शिक्षकांनी शिकवलेली गोष्ट आयुष्य़भर आपल्या लक्षात राहते... त्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आपलंपण असायला हवं. विद्यार्थी सर्वात जास्त वेळ आपल्या शिक्षकांसोबत व्यतीत करतात. एखादा शिक्षक हा कधीच रिटायर होत नाही. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांमुळेच संस्काराची पाळमुळं रुजवली जातात. एखाद्या कुंभाराप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांचं जीवन घडवतो. एखाद्या यशस्वी व्यक्तीच्या मागे नक्कीच त्याच्या शिक्षकांचं योगदान अधिक असतं. एखाद्या देश घडविणाऱ्यामागेही एखादा शिक्षक असतो, असंही यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय. 

यावेळी, पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ १२५ रुपयांचं स्मारक नाणं आणि १० रुपयांचं चलनात राहणारं नाणंही जाहीर केलंय. या कार्यक्रमासाठी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इरानीदेखील उपस्थित होत्या. मे २०१४ नंतर पंतप्रधान बनल्यानंतर मोदींचा हा शिक्षक दिनानिमित्त दुसरा कार्यक्रम होता.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.