चेन्नई - मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरली

चेन्नई-एम्मेर मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात हा अपघात घडलाय.

Updated: Sep 4, 2015, 11:00 AM IST
चेन्नई - मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरली title=
सौ. एएनआय

चेन्नई : चेन्नई-एम्मेर मंगलोर एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची माहिती मिळतेय. तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यात हा अपघात घडलाय.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेचे चार डब्बे उलटलेत. या अपघातात ३० हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. 

या अपघाताचा परिणाम सध्या चेन्नई रेल्वे मार्गावर जाणवतोय... अनेक रेल्वे मार्ग बदलण्यात आलेत. जखमींना जवळच्याच हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आलंय. 

हा अपघात शुक्रवारी रात्री २.०० वाजल्याच्या आसपास झालाय. यावेळी सगळेच प्रवासी गाढ झोपेत होते. रेल्वेला त्याच्या मार्गाकडे रवाना करण्यात आलंय. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे. 

रेल्वे रुळावरून घसरलेल्या डब्ब्यांना तिथून हटवण्यात येतंय. हा अपघात का घडलाय? त्याचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.