पंतप्रधानांना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूची आत्महत्या

पंतप्रधान मोदींना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूने आत्महत्या केली आहे.   फी नसल्याने या खेळाडूने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

Updated: Aug 21, 2016, 06:43 PM IST
पंतप्रधानांना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूची आत्महत्या title=

पटियाला : पंतप्रधान मोदींना रक्ताने चिठ्ठी लिहून हँडबॉल खेळाडूने आत्महत्या केली आहे.   फी नसल्याने या खेळाडूने आत्महत्येचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. 

धक्कादायक म्हणजे या तरुणीने आत्महत्येपूर्वी पंतप्रधानांना रक्तानं चिठ्ठी लिहिली आहे. दुसरीकडे रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांनी केलेल्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असताना ही घटना धक्का देणारी आहे.

आत्महत्येपूर्वी पंतप्रधान मोदींना रक्तानं चिठ्ठी लिहून प्रशिक्षकावर कारवाई करण्याची मागणी पूजाने केली आहे. फी नसल्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील हँडबॉल खेळाडू असलेल्या २० वर्षाच्या पूजाने आत्महत्या केली आहे. 

हॉस्टेलची फी भरण्यासाठी पूजाकडे पैसे नव्हते, पैसे नसल्याने तिला प्रवेश नाकारण्यात आला, प्रशिक्षकाने खोली देण्यास नकार दिला आणि नैराश्यात पूजाने आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे. पूजाला होस्टेलची फी भरण्यासाठी ३ हजार ७२० रुपयांची गरज होती.