एअरहोस्टेसकडे विमान सोपवून झोपी गेले पायलट्स !

एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 4, 2013, 06:13 PM IST

www.24taas.com, दिल्ली
एअर इंडियाचं विमान ३३,००० फूट उंचावर आकाशात असताना कॉकपीटमधील दोन पायलट्स विमान एअरहोस्टेसच्या ताब्यात देऊन चक्क झोपी गेले. बँकॉकहून दिल्लीला विमान येत असताना ही घटना घडली.
विमान आकाशात असताना विमानाचे सिनीयर पायलट फर्स्ट ऑफिसर रवींद्र नाथ लघुशंकेला जाण्यासाठी सीटवरून उठले. त्यांनी आपल्या जागेवर एर होस्टेसला बसवलं. मात्र ते गेल्यावर बराच वेळ पुन्हा आलेच नाहीत. कारण ते बिझनेस क्लासमध्ये जाऊन झोपले होते. एवढंच नव्हे, तर काही वेळात नाथ यांच्या को-पायलट बी के सोना यांनीही तेच केलं. दुसऱ्या एका एअरहोस्टेसला बसवून ते ही झोपी गेले.

या विमानात त्यावेळी १६६ प्रवासी होते. पायलट्सनी झोपण्यापूर्वी एअरहोस्टेसना विमान हाताळण्याची माहिती दिली. सुदैवाने या वेळी कुठलीही दुर्घटना मात्र अशा घटनेमुळे एअर इंडियाच्या विश्वासार्हतेला तडा जाण्याची शक्यता आहे.