पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणीची शक्यता

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत तेलाच्या किंमती ३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली होती. गेल्या सात वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे. 

Updated: Dec 14, 2015, 11:45 AM IST
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणीची शक्यता title=

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पेट्रोल-डिझेल तीन ते चार रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारत तेलाच्या किंमती ३९ डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरण झाली होती. गेल्या सात वर्षातील कच्च्या तेलाच्या किंमतीने गाठलेला हा नीचांकी स्तर आहे. 

विशेषज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत आणखी घसरण होऊन ते प्रति बॅरल २० डॉलर होण्याची शक्यता आहे. २०१३ मध्ये तेलाच्या किंमती प्रति बॅरल १३० डॉलर इतकी होती. शुक्रवारी तेलाच्या किंमती प्रति बॅरल ३९ डॉलरपर्यंत घसरल्या. २००८ नंतर प्रथमच मोठी घसरण पाहायला मिळाली. 

चालू तिमाहीत दिवसाला तेलाची मागणी १३ लाख बॅरल इतकी आहे. गेल्या तिमाहीत या कालावधीत ही मागणी २२ लाख इतकी होती. किंमतीसोबतच मागणीतही घसरण झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही घसरण होण्याची शक्यता आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.