नव्या वर्षात येणार "अच्छे दिन'

रोजगारासाठी पुढील वर्ष 'अच्छे दिन' आणणारे ठरणार आहे. पुढील वर्षांत वेतनात १० ते ३० टक्के वाढीची आशा आहे. तसेच खासगी सेक्टरमधील ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 14, 2015, 11:29 AM IST
 नव्या वर्षात येणार "अच्छे दिन' title=

नवी दिल्ली : रोजगारासाठी पुढील वर्ष 'अच्छे दिन' आणणारे ठरणार आहे. पुढील वर्षांत वेतनात १० ते ३० टक्के वाढीची आशा आहे. तसेच खासगी सेक्टरमधील ई-कॉमर्स आणि उत्पादन क्षेत्रातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

सातवे वेतन आयोगामुळे यात तेजी येण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात चांगली वाढ होईल याचा परिणाम खासगी क्षेत्रावरही होईल. ह्युमन रिसोर्स एक्सपर्टच्या अंदाजानुसार नव्या वर्षात रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. २०१५च्या तुलनेत पुढील वर्ष नक्कीच चांगले राहील. अनेक कंपन्यांमध्ये नियुक्ती केल्या जातील. 

ई-कॉमर्स आणि इंटरनेट संबंधित क्षेत्रांमध्ये अधिक रोजगारांच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मेक इन इंडिया अभियानांतर्गत उत्पादन क्षेत्रातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. नव्या वर्षात पगारांत १२ ते १५ टक्के वाढीची आशा एक्सपर्टनी व्यक्त केलीये. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.