हैदराबाद : भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नेहमी टीकेची झोड उठविणारे एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी सर्वांना बुचळ्यात पाडणारे विधान केले आहे.
छोटे ओवैसी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अकबरुद्दीन यांनी म्हटले की, एमआयएम आणि नरेंद्री मोदी यांनी एकत्र आल्यास देशातून काँग्रेसला उखडून फेकून देऊ. ओवैसी एका व्हिडिओमध्ये हे वक्तव्य करताना दिसत आहे.
३० जानेवारी रोजी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम) ची बाबा नगर येथे सभा झाली. त्यावेळी ओवैसी यांनी हे आश्चर्यकारक विधान केले आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी सध्या ओवैसी प्रचार करीत आहेत.
अकबरुद्दीन यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटले की काँग्रेसचे नेते गांधी परिवाराचे गुलाम आहेत. नरेंद्र मोदी यांच्याशी हातमिळवणी करून सर्व देशातून काँग्रेसला साफ करेल.
दरम्यान, वरिष्ठ काँग्रेसचे नेते हनुमंत राव यांनी यावर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र आणि बिहार निवडणुकांमध्ये एमआयएम आणि भाजपचे छुपी युती होती.