पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी आकडा, काही राजकीय पक्षांपेक्षा 'नोटा' या पर्यायाला होता. भाजपने जितनराम मांझीला मागासवर्गीयांची वोट बँक समजण्याचीही चूक केली, कारण मांझी यांच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
विधानसभा निवडणुकीत २.५ टक्के मतदारांनी नोटाचं बटन दाबलं. नोटा पर्याय असे मतदार वापरतात, ज्यांना कोणत्याच उमेदवाराला मत देणं पसंत नसतं, यापैकी नाही, असाच नोटाचा पर्याय असतो, नोटाला बिहार विधानसभा निवडणुकीत एकूण ९ लाख ४७ हजार १८५ मतं मिळाली.
जितनराम मांझीचा पक्ष हिदुस्तानी आवाम मोर्चाला २.३ टक्के मतं, म्हणजेच ८ लाख ४६ हजार मतं मिळाली. नोटापेक्षा जास्त मतं बिहारमधील केवळ सात पक्षांनी मिळाली, यात १५ पक्षांना नोटापेक्षा कमी मतं मिळाली यात, जितनराम मांझी यांच्या पक्षाचा देखील समावेश आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.