टीपू सुल्तान जयंतीवरून वाद, विहिंपच्या नेत्याचा मृत्यू

कर्नाटक काँग्रेस सरकारनं टीपू सुल्तानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याची निर्णय घेतलाय. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

Updated: Nov 10, 2015, 04:33 PM IST
टीपू सुल्तान जयंतीवरून वाद, विहिंपच्या नेत्याचा मृत्यू title=

मंगळुरू : कर्नाटक काँग्रेस सरकारनं टीपू सुल्तानची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी करण्याची निर्णय घेतलाय. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटलंय. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक नेत्याचा मृत्यू झाला असून या घटनेसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्याच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. 

भाजप आणि आरएसस मात्र याला विरोध करणार आहे. टीपू सुल्तान हे लोकांना धर्मपरिवर्तन करायला भाग पाडणारे असल्याचा आरोप त्यांनी केलाय. आरएसएस त्यांना अत्याचारी मानतंय. 

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला व यात विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा संयोजक कुटप्पा यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत राज्यभरात आंदोलन करु असा इशारा दिला आहे. 

दरम्यान, आमच्याकडून या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलाय. आमच्याकडून कोणीही जयंती कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचं भाजपकडून सांगण्यात आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.