भारताच्या नोटबंदीने का खुश आहे अमेरिका आणि चीन...

 भारतात नोटबंदीनंतर नोटांच्या कमतरतेमुळे देशभरात ऑनलाइन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या नोटबंदीचा भारतीय बॅंका तसेच व्यापाऱ्यांनाबरोबरच भारताबाहेरील व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होत आहे. 

Updated: Nov 23, 2016, 09:52 PM IST
 भारताच्या नोटबंदीने का खुश आहे अमेरिका आणि चीन... title=

नवी दिल्ली :  भारतात नोटबंदीनंतर नोटांच्या कमतरतेमुळे देशभरात ऑनलाइन खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले आहे. या नोटबंदीचा भारतीय बॅंका तसेच व्यापाऱ्यांनाबरोबरच भारताबाहेरील व्यापाऱ्यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या याचा फायदा होत आहे. 

 
भारतात अनेक एटीएममधील अडचणींमुळे लोकांना पैसे काढण्यासाठी त्रास होत आहेत. त्यामुळे एटीएम सॅाफ्टवेयर आणि ट्रे बदलण्याची गरज आहे. हे सॅाफ्टवेयर आणि ट्रे चीनमधून खरेदी करण्यात आले आहेत आणि ते भारतात आयात होत आहेत, असे बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. 
 
स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य यांनी सांगितले की, आयात केलेले मॅग्नेटीक स्पेसर आणि वेज सध्या साठ्यात नाही आहेत. जेव्हा हे हार्डवेअर एटीएममध्ये बसवण्यात येईल तेव्हा सर्व एटीएममधून व्यवस्थित  पैसे काढता येता येणार आहेत.

या नोटबंदीमुळे स्वाईप मशीन तसेच पावती प्रिटींग मशीनच्या मागणीमध्ये देखील मोठ्याप्रमाणावर वाढ झाली आहे. अशा अनेक मशीन्स या अमेरिका आणि चीन मधून आयात करण्यात येत आहेत. तसेच 500 आणि 1000 च्या नोटा छापण्याचे काम देखील मोठ्याप्रमाणावर चालू आहे. यासाठी लागणारी सिक्युरिटी फिचर्स, शाई आणि कागद हे परदेशातून मागवण्यात येत आहेत. भारताच्या नोटबंदीच्या निर्णयाला अनेक देश मदत करत आहेत.