मुंबई : तुमचंही एखाद्या बँकेत खातं असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तुमचं बँक खातं बंद होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला बँकेत तुमचा पॅन कार्ड नंबर जमा करावा लागणार आहे.
तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर बँक अकाऊंटशी जोडण्यासाठी केवळ पाच दिवस उरलेत. बँकांना 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व खातेधारकांना पॅन नंबर जोडण्याचे आदेश देण्यात आलेत.
ज्या व्यक्तीचं बँक खातं केवळ फोटो ओळखपत्र आणि आवास ओळखपत्राच्या आधारावर सुरू आहे त्यांना आपला पॅन नंबरही द्यावा लागणार आहे.
1 मार्चपासून कोणत्याही व्यक्तीला नवीन बँक अकाऊंट उघढण्यासाठी पॅन अनिवार्य राहील.
आयकर विभागाची नवी व्यवस्था लागू झाल्यानंतर एका व्यक्तीचे वेगवेगळ्या बँकांतील खात्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची ठरणार आहे.