"योगच्या राजकारणापेक्षा योग करा"

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना योगाविषयी सल्ला दिला आहे.  'योगा'या विषयावर राजकारण करण्यापेक्षा दररोज योगा करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला आहे.

Updated: Jun 14, 2015, 03:46 PM IST
"योगच्या राजकारणापेक्षा योग करा" title=

पटना : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांना योगाविषयी सल्ला दिला आहे.  'योगा'या विषयावर राजकारण करण्यापेक्षा दररोज योगा करावा, असा सल्ला नितीश कुमार यांनी दिला आहे.

शाह यांच्याबाबत बोलताना कुमार यांनी म्हटले आहे की, ‘त्यांनी त्यांचे शरीर बघायला हवे. ते योगासाठी योग्य आहे का? तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी घरी दररोज हळूहळू योगा करावा. त्यामुळे त्यांच्या आतसुद्धा बदल होऊ शकेल‘ ते पुढे म्हणाले की, ‘योगा हा फार उपयोगी आहे. 

चांगल्या आरोग्यासाठी मी दररोज घरी योगा करतो. पण भारतीय जनता पक्ष योगाच्या नावाखाली वादाला सुरुवात करून बढाया मारत आहे' 

अमिश शाह हे २१ जून रोजी पटनामध्ये होणाऱ्या योगाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावर्षाच्या शेवटी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.