निर्भया डॉक्युमेंटरी : तिहार जेल प्रशासनाची बीबीसीला नोटीस

निर्भया डॉक्युमेंटरी प्रकरणी तिहार जेल प्रशासनानं बीबीसी, लेस्ली उडवीन आणि को-प्रोड्युसर अंजली भूषणला नोटीस पाठवली आहे. 

Updated: Mar 6, 2015, 06:23 PM IST
निर्भया डॉक्युमेंटरी : तिहार जेल प्रशासनाची बीबीसीला नोटीस title=
छाया - बीबीसी

नवी दिल्ली : निर्भया डॉक्युमेंटरी प्रकरणी तिहार जेल प्रशासनानं बीबीसी, लेस्ली उडवीन आणि को-प्रोड्युसर अंजली भूषणला नोटीस पाठवली आहे. 

२०१३ मध्ये कैदी मुकेश सिंहची मुलाखत घेण्यासाठी लेस्लीनं मोठी खटाटोप केली होती. यासाठी खुल्लर नावाच्या व्यक्तीनं तिला मदत केल्याचं समोर आलंय. सुरूवातीला या दोघांना अपयश आलं. मात्र गृहमंत्रालय आणि तिहार जेलच्या डीजी विमला मेहरा यांची परवानगी मिळवण्यात ते यशस्वी झाले. 

मुकेश आणि त्यांच्या कुटुंबियांनी दोन लाखाची मागणी केली होती. मात्र नंतर ४० हजारांमध्ये हा व्यवहार झाल्याची माहिती जेलच्या सूत्रांनी दिलीय. 

दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्या मुकेश सिंहच्या मुलाखतीबाबत आणखी एक धक्कादायक बाब उघड झालीय. मुकेश सिंहला मुलाखतीसाठी ४० हजार रुपये देण्यात आले होते, अशी माहि्ती तिहार जेलमधील सूत्रांनी दिलीय.

हे पैसे डॉक्युमेंट्री बनवणा-या लेस्ली उडविन आणि तिच्या कंपनीने दिले होते. तिहार जेलमधल्या चौकशीत ही बाब समोर आली आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.