सविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. (थेट प्रक्षेपण व्हिडिओ पाहा)

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 24, 2016, 06:55 PM IST
सविस्तर वृत्तांत : बीकेसीमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांचे भूमीपूजन title=

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे जलपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं.

पंतप्रधानांचे बीकेसीतील कार्यक्रम ठिकाणी आगमन झालंय. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्प अर्पण केलं. या सोहळ्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकया नायडू, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय ऊर्जामंत्री पियुष गोयल, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्यमंत्री रणजित पाटील, राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित आहेत.

- पंतप्रधानांच्या हस्ते ६ प्रकल्पांचे भूमीपूजन

१) मेट्रो २ बी - डीएन नगर-वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स-मानखुर्द

२) मेट्रो ४ - वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली

३) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक

४) कुर्ला-वाकोला उन्नत रोड

५) कलानंगर जंक्शन उड्डाणपूल 

६) एमयूटीपी-३

LIVE भाषणं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी

- छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो : पंतप्रधानांनी मराठीत केली भाषणाला सुरुवात

- आज मी किती आनंदीत आहे याची तुम्ही कल्पना करू शकता

- २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने मला निवडणुकीची जबाबदारी दिली तेव्हा मी प्रथम रायगडावर गेलो

- सुशासन आणि प्रशासनाचा अध्याय लिहणाऱ्या महाराजांच्या समाधीसमोर बसलो

- जगाच्या इतिहासात संकटात अशा पद्धतीने सुशासन राबवणारे महाराज आहेत

- सामान्य माणसाच्या मनात महाराजांची प्रतिमा सारखीच आहे 

- छ्त्रपतींचे बहुआयामी व्यक्तीमत्व होते 

- आपल्या देशाची माती अशी आहे ज्या मातीत युद्धभूमीवर प्रेरणा देणारी गीता सांगितली जाते 

- महात्मा गांधींनी लोकांच्या मनात स्वातत्र्यांची ज्योत पेटवली

- रामाने वानरांची सेना तयारी केली छत्रपतींनीही सामान्य मावळ्यांची सेना तयार केली आणि संकटाचा मुकाबला केला

- महाराजांची मुद्रानीती महत्त्वाची होती

- मुद्रा तयार करायला महाराजांनी स्वत:ची व्यवस्थी निर्माण केली, परदेशी व्यवस्थेकडे हे काम सोपवले नाही

- महाराजांनी सामुद्रिक सामर्थ्य उभे केले ते नेव्हीसाठी आजही उपयुक्त ठरत आहे

- पर्यटन आज महत्त्वपूर्ण आहे

- आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात किल्ले आहेत, त्याचा इतिहास आहे, पराक्रम आहे

- पण आपण ताजमहालच्या बाहेर पडलो नाही

- जगासमोर हे सगळे आणले तर जगातील पर्यटन आपल्याकडे आकर्षित करू शकतो

- छत्रपतींच्या किल्ल्याचे जतन करून ते जगासमोर आणले तर जगाचे पर्यटक आपल्याकडे वळतील

- फडणवीस सरकारने जो स्मारकाचा संकल्प केला आहे तो पूर्ण होईल

- स्मारक पूर्ण झाले तर ते जगातील एक आश्चर्य ठरेल

- देश स्वातंत्र्यानंतर आपण विकासकांचा मार्ग चोखाळला असता तर आज ज्या समस्या आहेत त्या दिसल्या नसत्या

- देशाला पुढे नेण्याची, सन्मानाने पुढे जाण्यासाठी विकास महत्त्वाचा

- आम्ही विकासाला केंद्रबिंदू ठेवले आहे

- गरीबांच्या आशा पूर्ण करण्यात विकास महत्त्वाचा

- आमच्या सर्व योजनांमध्ये गरीबांचे कल्याण आहे

- गरीबांना स्वस्तात औषधे मिळावीत म्हणून आन्ही जनेरिक मेडिसीनवर भर दिला

- गरीबांना चुलीच्या धुरापासून मुक्ती देण्यासाठी करोडो गॅस कनेक्शन दिले

- पुढील पाच वर्षात ५ करोड कनेक्शन देणार

- ज्या गावात अजून वीज पोहचली नाही त्या ठिकाणी एक हजार दिवसात १८ हजार गावात वीज पोहचवण्याचा संकल्प केला आहे

- कोण म्हणते देश बदलणार नाही, देश बदल रहा है, बढ रहा है

- तीन वर्षांच्या अनुभवावरून मी हे सांगतो आहे

- १ लाख ६ हजार कोटींच्या विकास कामांचा एकट्या मुंबईत एका वेळी शुभारंभ होत आहे

- ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता आम्ही एक मोठा हल्ला केल...  काळे धन, भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई सुरू केली

- सव्वाशे कोटी जनतेला त्रास झाला पण जनतेने माझी साथ सोडली नाही

- काही लोकांनी अफवा पसरवली पण लोकांनी आम्हाला साथ दिली

- ७० वर्ष ज्यांनी मलाई खाल्ली त्यांनी हे सफल होऊ नये म्हणून पूर्ण ताकद लावली

- पण सव्वाशे कोटी लोकांसमोर हे लोक टिकू शकले नाहीत

- काही लोकांना वाटले बँकांना पटवले तर काळे पैसे पांढरे होतील, पण ते मेले आणि बॅंकवालेही मेले

- मी बोललो होतो पन्नास दिवस त्रास होईल

- पण देशवासियांना हा त्रास सहन केला, यापुढे काही दिवस त्रास होईल तोही सहन करतील

- 50 दिवसांनी इमानदार लोकांचा त्रास कमी होईल आणि बेईमान लोकांचा त्रास वाढेल

- आजही वेळ गेली नाही बेईमान लोकांनी सुधरावं, कायदे नियम पाळावेत

- आम्हाला तुम्हाला फाशीवर लटकवायचे नाही, पण तुम्ही सुधारा

- आता बेईमान लोकांच्या त्रासाचे दिवस सुरू झाले अहेत...  त्यासाठी ही स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे

- मुठभर लोक बेईमानी करतात आणि कोट्यवधी लोकांना सहन करावे लागते

- बेईमान लोकांना मोदी, सरकारची भीती वाटत नसेल तरी चालेल पण सव्वाशे कोटी लोकांच्या भावनांची भीती वाटली पाहिजे

- ही लढाई जिंकेपर्यंत थांबणार नाही

देवेंद्र फडणवीस

- आई भवानीला नमन आणि छत्रपतींना मानाचा मुजरा

- हा महत्त्वाचा योग

- ३५२ वर्षांपूर्वी याच महिन्यात महाराजांनी सिधुदुर्ग किल्ल्याचे जलपूजन केले होते 

- आम्ही छ्त्रपतींचे सेवक आहेत सत्तेवर येताना जगातील सगळ्यात उंच स्मारक बनवण्याचा संकल्प केला 

- आमचे छत्रपती जगात मोठे होते 

- या राज्यातील सामान्य माणसाला एकत्र घेऊन जाण्याचा मी आज संकल्प करतो

- हा पुतळा नाही जिवंत वास्तू आहे त्यातून आम्हाला प्रेरणा मिळेल

- छत्रपतींचा महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याची प्रेरणा मिळेल

- मला शिवा होता येणार नाही, पण जिवा होऊ दे अशी आई भवानी चरणी प्रार्थना

- मी पंतप्रधान आणि जावडेकरांचे आभार मानतो 

- मुंबई - नवी मंबई जोडणारा सगळ्यात मोठ्या सेतुचेही भूमिपूजन होते आहे

- मुंबईत २०० किलोमीटर मेट्रोचे जाळे उभे करत आहोत

- मेट्रोची ९० लाख प्रवासी संख्या असेल

- एमयूटीपीचाही शुभारंभ आज होत आहे 

- या सगळ्यांना सिंगल तिकीट विडोंने जोडणार

- मुंबई आम्ही सामान्य माणसासाठी घडवतो आहे 

- जगभरातून लोक शिवरायांना वंदन करायला मुंबईत येतील

उद्धव ठाकरे

- आज मी इथे शिवरायांना वंदन करायला आलो आहे 

- नाताळ बाबांच्या पोतडीतून एक एक वस्तू बाहेर येतात तसे आज विविध प्रकल्पांचा शुभरंभ होतोय

- छत्रपती आजही आपल्यात आहेत

- हे स्मारक केवळ स्मारक राहणार नाही

- छत्रपतींचा पराक्रम आपल्याला पेलवणार आहे का, पेलवणार असेल तर भवानी तलवार आणणे झेपेल

- त्या काळात राजांनी सिंधुदुर्ग बांधला तसे हे आज स्मारक बांधण्यासारखे आहे 

- मोदीजी महाराजांचे गडकिल्ले दिल्लीच्या पुरातत्व खात्याकडे आहेत ते मोकळे करा

- देवेंद्रजी आहेत, आम्ही सोबत आहोत त्याची आम्ही काळजी घेऊ

- कोस्टल रोडही अंतिम टप्प्यात आहे 

- पर्यावरण खात्याची परवानगी शिल्लक आहे ती लवकर मिळेल

- सरकार आणि महापालिका हा प्रकल्पही लवकर पूर्ण करेल असा मला विश्वास आहे 

- शिवचरणी प्रार्थना करतो जगाला प्रेरणादायी ठरेल स्मारक

नितीन गडकरी 

- आज महाराष्ट्राच्या इतिहासातला सुवर्णाक्षरांनी लिहला जावा असा दिवस आहे

- आपले पंतप्रधान छत्रपतींचे परम भक्त आहेत

- राज्यात छत्रपतींच्या आदर्शांवर आधारित राज्य 

- भारतात शिवशाही साकार करावी असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे 

- अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक होतेय त्याची मला आनंद आहे 

- देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकासाठी पाठपुरावा केला

- मी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो

- जानेवारीमध्ये स्मारकाचे काम सुरू होत आहे ही अभिनानाची गोष्ट आहे 

- आम्हाला देशात विकासाचे राजकारण करायचे आहे आणि शिवशाही आणायची आहे

- छत्रपतींचा आशिवार्दा, त्यांचा संकल्प पंतप्रधान प्रत्यक्षात आणणार आहेत

- राज्यात ३ लाख कोटींपेक्षा जास्त किंमतीचे रस्ते पाच वर्षात बांधले जाणार आहेत

 सुरेश प्रभू, रेल्वे मंत्री

- संपूर्ण राज्यभर वातावरण शिवमय झाले आहे

- आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी मुंबईकरांना रेल्वेची मोठी भेट दिली आहे 

- रेल्वेचे ५५ हजार कोटींच्या प्रकल्पांची सुरुवात होणार आहे 

- त्यासाठी राज्य सरकारबरोबर रेल्वेचा करार होत आहे 

- आम्ही रेल्वे प्रवाशांसाठी दोन वर्षात अनेक प्रकल्प पूर्ण केले

- रेल्वे प्रवाशांच्या सुखसोयीचा शुभारंभही आज होत आहे 

- राज्यातील इतर ठिकाणी २२ हजार कोटींचे प्रकल्पासाठी रेल्वे आणि राज्य सरकारने सुरू केले  आहेत

- रेल्वेमुळे लोंकाच्या जीवनात बदल होणार आहे 

- रेल बढे देश बढे

- पंतप्रधानांनी रेल्वेला खूप निधी दिला आहे

 चंद्रकांत पाटील प्रास्ताविक भाषण

- आज सगळे भारतवासियांसाठी गोरवाचा दिवस आहे

- छत्रपतींच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे 

- आपल्या देशाचे अस्तित्व छत्रपतींमुळे

- शिवस्मारक आगामी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे