मॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

Updated: Jun 30, 2015, 06:12 PM IST
मॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम title=

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

केंद्र सरकारने मॅगीमध्ये आरोग्यास हानीकारक घटक असल्याने बंदी घालण्याचा निर्णय घेतला. यामुळे मॅगीच्या कोट्यवधींच्या मालाचे नुकसान टाळण्यासाठी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका केली. यावर सुनावणी करताना न्यायालयाने कंपनीला दिलासा देणारा निर्णय दिला आहे.

मॅगीच्या निर्यातीला परवानगी दिल्यामुळे नेस्ले कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी न्यायालयाने बंदी कायम ठेवत हा निर्णय दिला. या प्रकरणावरील पुढील सुनावणी 14 जुलैला होणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.