विद्यार्थांच्या प्रवेश परीक्षा ओळखपत्रावर कुत्र्याचा फोटो

कोलकातामधील मेदिनीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रवेश पत्रावर स्वत:चा फोटा लावण्याऐवजी कुत्र्याचे छायाचित्र लावले. याप्रकरणी सौम्यदीप महतो या विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Updated: Jun 30, 2015, 04:57 PM IST
विद्यार्थांच्या प्रवेश परीक्षा ओळखपत्रावर कुत्र्याचा फोटो title=

पश्चिम बंगाल : कोलकातामधील मेदिनीपूर जिल्ह्यात एक धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रवेश पत्रावर स्वत:चा फोटा लावण्याऐवजी कुत्र्याचे छायाचित्र लावले. याप्रकरणी सौम्यदीप महतो या विद्यार्थ्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

१८ वर्षीय सौम्यदीप याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान, शिक्षणमंत्री उज्ज्वल विश्वास यांनी सौम्यदीप याची चौकशी केली पाहिजे, असे म्हटले. आयटीआय प्रवेश परीक्षा ओळखपत्रावर चक्क कुत्र्याचे छायाचित्र कसे आले?

दरम्यान, दक्षिण बंगला स्टेट काऊंसिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगची कॉमन प्रवेश परीक्षा प्रश्न फुटल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विश्वास यांनी सांगितले, सौम्यदीपने ओळखपत्रावर आपले छायाचित्र लावले होते. त्यानंतर त्याने सही केली मग, असे कसे झाले. यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.