खासदारांची चांदी, पगारात होणार १०० टक्के वाढ

 केंद्र सरकारने खासदारांच्या मूळ वेतनात १०० टक्के वाढ करण्याच्या शिफारशीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असून खासदारांची चांदी होणार आहे. 

Updated: Nov 2, 2016, 09:22 PM IST
 खासदारांची चांदी, पगारात होणार १०० टक्के वाढ title=

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने खासदारांच्या मूळ वेतनात १०० टक्के वाढ करण्याच्या शिफारशीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार असून खासदारांची चांदी होणार आहे. 

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खासदारांचे वेतन ५० हजार रुपयांनी वाढणार आहे. त्यामुळे त्यांचे मूळ वेतन १ लाख रुपये होऊ शकते. 

भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखाली समितीने खासदारांचे वेतन ५० हजार रुपयांनी वाढवून १ लाख आणि त्यांच्या मतदार संघातील भत्ता ४५ हजारावरून वाढून ९० हजार करण्याची शिफारस केली होती. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीएम मोदी यांनी शिफारशींना हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच निर्णय घेणार आहे. पंतप्रधान खासदारांच्या मूळ वेतनात वाढ करण्याच्या शिफारशीवर सहमत तर आहेच पण त्यांच्या मतदार संघातील भत्त्यात वाढीवरही त्यांनी पसंती दिली आहे. 

राष्ट्रपतींचा पगार वाढणार 

तसेच केंद्र सरकारने राष्ट्रपतींची सध्याचा १.५ लाख रुपये पगार वाढवून प्रति महिना ५ लाख रुपये करण्याचा विचार केला आहे. तसेच राज्यपालांचे वेतर १.१० लाखांवरून २.५ लाख करण्याचा विचार आहे.