नवी दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ तारखेपासून सुरू होतंय. दरम्यान, रोहित वेमालूची आत्महत्या, असहिष्णुतेबाबत चर्चा या पार्श्वभूमीवर सरकारला विरोधाचा सामना या अधिवेशनात करावा लागणार आहे.
२५ तारखेला रेल्वे बजेट मांडलं जाईल. सुरेश प्रभू हा अर्थसंकल्प मांडतील. तर २९ फेब्रुवारीला अर्थमंत्री अरूण जेटली मुख्य अर्थसंकल्प संसदेसमोर ठेवतील. दरम्यान, हैदराबादच्या रोहित वेमालूची आत्महत्या, देशात वाढत्या असहिष्णुतेची चर्चा या पार्श्वभूमीवर प्रखर विरोधाचा सामना सरकारला या अधिवेशनात करावा लागणार हे नक्की आहे. तशी मोर्चेबांधणी विरोधी पक्षांनी केली आहे.
विरोधकांच्या व्युहरचनेमुळे संसदेचे कामकाज सुरळीत ठेवण्याचं खडतर आव्हान मोदी सरकारपुढे आहे. तसंच GST, जमीन हस्तांतरण यासह अनेक रखडलेली महत्त्वाची विधेयकं या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी मार्गी लागणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.