मोदी सरकारकडून दाऊदचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन

डी कंपनीचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन मोदी सरकारने केलाय. बनावट चलन हा डी कंपनीचा सर्वात मोठा भारतातला धंदा आहे. त्याला मुळापासून उखडण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केलीय. दाऊदच्या या धंद्याचे सर्व पुरावे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या टास्क फोर्सला दिलेत.

Updated: Aug 7, 2014, 11:41 PM IST
मोदी सरकारकडून दाऊदचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन title=

नवी दिल्ली : डी कंपनीचं कंबरडं मोडण्याचा प्लॅन मोदी सरकारने केलाय. बनावट चलन हा डी कंपनीचा सर्वात मोठा भारतातला धंदा आहे. त्याला मुळापासून उखडण्याची तयारी मोदी सरकारने सुरू केलीय. दाऊदच्या या धंद्याचे सर्व पुरावे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या टास्क फोर्सला दिलेत.

जानेवारी 2010 ते जून 2014 मध्ये भारतात आले 2500 कोटींचे बनावट चलन. त्यातले 445 कोटी रूपयेच झाले जप्त.

अजूनही फिरतंय 2045 कोटींचे बनावट चलन, त्यावर आहे दाऊदच्या नोट फॅक्ट्रीची मोहोर.

संयुक्त राष्ट्रांच्या फायनान्शिअल ऍक्शन टास्क फोर्सला भारताच्या गुप्तचर संस्थेने दिलेल्या अहवालात हा गौप्यस्फोट करण्यात आलाय. झी मीडियाकडे गुप्तचरांच्या या रिपोर्टची कॉपी आहे..

पंतप्रधानपदावर विराजमान होण्यापूर्वीच मोदींनी दाऊदला भारतात आणण्याची घोषणा केली होती.

गुप्तचरांच्या रिपोर्टनुसार भारतातल्या बनावट चलनाचा गोरखधंदा पाकिस्तानातून दाऊद ऑपरेट करतो. त्याला पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयची मदत होते.

भारताच्या गुप्तचर यंत्रणांचा अहवाल थक्क करतो. बनावट चलनात वापरली जाणारी शाई ही पाकिस्तानी चलनासाठी वापरल्या जाणा-या शाईशी मिळती जुळती आहे.भारताने दाऊदच्या 11 माणसांची नावं या अहवालात दिली आहेत.

मोहम्मद इक्बाल उर्फ मोहम्मद काणा, वय- 50 वर्षे, भारतीय
सईद मोहम्मद शाफी उर्फ शेख शाफी, वय- 60 वर्षे, पाकिस्तानी
अस्लम चौधरी उर्फ तैमूर, वय- 50 ते 55 वर्षे, पाकिस्तानी
अब्दुल गफार उर्फ गुड्डू, वय- 64 वर्षे, थायलंड
जमील मुहम्मद, वय- 46 वर्षे, पाकिस्तानी

हे सगळेजण दाऊदच्या टांकसाळीत छापलेल्या बनावट भारतीय नोटा भारतात पसरवतात. बनावट चलनाच्या धंद्यावर टाच आली तर दाऊदचं मोठं कंबरड मोडणार यात शंकाच नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.