चिमुकल्याच्या हातात झाला चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट

तुम्हालाही तुमचा फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळणं किंवा एखाद्या अॅपसोबत खेळत राहण्याची सवय असेल तर ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते. 

Updated: Feb 5, 2016, 06:27 PM IST
चिमुकल्याच्या हातात झाला चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट title=

नवी दिल्ली : तुम्हालाही तुमचा फोन चार्जिंगला लावून त्यावर गेम खेळणं किंवा एखाद्या अॅपसोबत खेळत राहण्याची सवय असेल तर ती तुम्हाला धोकादायक ठरू शकते. 

अशीच एक घटना तामिळनाडूमध्ये घडलीय. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका चिमुरड्याच्या हातात मोबाईलचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना इथं पाहायला मिळाली. 

हा मोबाईल फोन चार्जिंगसाठी लावण्यात आला होता. मोबाईल कॉल आल्यानंतर नऊ वर्षांच्या धनुषनं हा कॉल घेण्यासाठी फोन हातात घेतला... आणि त्याच वेळी मोबाईलचा जोरदार स्फोट झाला. 

यामुळे, धनुषचा उजवा हात, चेहरा आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर इजा झालीय. दुर्घटनेनंतर त्याला लगेचच चेंगलपट्ट स्थित एका सरकारी हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आलं. धनुषची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.