नवी दिल्ली : 24 तारखेनंतर भारताचा मंगळयान मंगळाच्या कक्षेत घिरट्या घालू लागेल आणि याच वेळी तो मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवू लागेल. मंगळयान मंगळाच्या कक्षेत काय करेल आणि कशा प्रकारे ही माहिती आपल्याकडे पाठवेल याबाबतचा एक खास रिपोर्ट.
भारताचा मिशन मार्स यशाच्या अगदी जवळ पोहोचलाय. 120 कोटी भारतीयांसह साऱ्या जगाच्या नजरा भारताच्या मिशन मार्सवर लागल्यात.. यापूर्वीही चीन आणि जपानंनं मंगळावर पोहोचण्याचे प्रयत्न केलेत मात्र त्यात हे दोन्ही देश अपयशी ठरले. त्यामुळे जर भारताला यात यश मिळालं तर भारत हा मंगळावर पोहोचणारा आशियाखंडातील पहिलाच देश असेल.
1960 पासून ते आतापर्यंत मंगळावर तब्बल 45 अभियान करण्यात आले ज्यापैकी एक तृतियांश अयशस्वी झालेत. आतापर्यंत कोणताही देश पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला नाहीये.. आणि भारताचा हा पहिलाच प्रयत्न आहे..यापूर्वी भारताच्या चांद्रयानाला आपल्या मिशनपर्यंत पोहोचण्यासाठी केवल चार लाख किलोमिटरचं अंतर पार करावं लागलं होतं.
मात्र मंगळयानाला चाळीस कोटी किलोमीटर अंतर कापावं लागलंय..मंगळ पृथ्वीपासून 200 ते 400 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. त्याची कक्षा अंडाकृती आहे. त्यामुळे हे अंतर कापायला मंगळयानाला तब्बल नऊ महिन्यांचा कालावधी लागला. मंगळाच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर त्यावर संदेश पाठवण्यासाठी केवळ 20 मिनिटं लागतील आणि त्याचं उत्तर देण्यासाठी मंगळयानालाही 20 मिनिटांचा अवधी लागेल. म्हणजेच संदेशांच्या देवाणघेवाणीला 40 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
भारताचा मंगळयान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार नाही. तो मंगळाच्या पृष्ठ भागाच्या 250 ते 8000 किलोमिटर दूर लाल ग्रहाच्या कक्षेत फिरत राहील आणि कमीत कमी सहा महिन्यांपर्यंत मंगळाविषयी महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवर राहील.. मंगळावर पाणी जीवसृष्टी आहे का, मीथेन गॅसचं अस्तीत्त्व आणि शोध तसंच मंगळावरील खनिज संपत्तीचा शोधघेणं हे या मंगळयानाचं मुख्य काम असणार आहे.
मंगळयानावरून पाठवले जाणारे संदेश ग्रहण करण्यासाठी चार अर्थस्टेसन्स स्थापन करण्यात आलेत. यात अमेरिकेच्या नासाचीही मदत घेण्यात आलीये. त्यामुळे आता लवकरच मंगळावर मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे. कारण आता मंगळ भारताच्या मुठीत असणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.