मंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस

मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहोचले. अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.

Updated: Sep 24, 2014, 11:23 AM IST
मंगळयान मोहीम फत्ते, इस्त्रोचा ऐतिहासिक दिवस title=

सकाळी - ८. ३६ वाजता 
आणखी मंगल कार्य करण्याची प्रेरणा मंगळ मोहीम आम्हाला देत आहे - मोदी

सकाळी - ८. ३० वाजता
आज देशात आनंदोत्सव व्हायला हवा, शाळा - महाविद्यालयांनी किमान पाच मिनिटे एकत्र येऊन टाळ्यांच्या कडकडाटात शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले पाहिजे - मोदी

सकाळी - ८. २२ वाजता
भारताने अंतराळ मोहीमेत प्रगत देशांनाही मागे टाकल्याचा सार्थ अभिमान आहे - मोदी  

सकाळी - ८. २० वाजता
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांची ही कामगिरी कौतुकास्पद आहे - मोदी

सकाळी - ८. १५ वाजता
मोदींचे गौरवोदगार. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवले आहे. त्यांना ती सवय लागली आहे. 

सकाळी - ८. १२ वाजता
मंगळ मोहिमेत भारत यशस्वी झाला आहे, मात्र यशासोबतच नवीन आव्हानंही येतात. पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही. भारतीय शास्त्रज्ञ या नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम - मोदी

सकाळी - ८. १० वाजता
पहिल्याच प्रयत्नात कोणत्याही देशाला मंगळ मोहीमेत यश आलेले नाही. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेच (इस्रो) ही किमया साधली - मोदी

सकाळी - ८.०९ वाजता
भारताने इतिहास घडवला - मोदी

सकाळी - ८.०८ वाजता
जगात देशाचे नावाचा दबदबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले देशवासियांना संबोधित

सकाळी - ८.०० वाजता

 ISRO's Mars Orbiter

What is red, is a planet and is the focus of my orbit? pic.twitter.com/HDRWjOcPus

— ISRO's Mars Orbiter (@MarsOrbiter) September 24, 2014

सकाळी - ७.४८ वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले शास्त्रज्ञांचे अभिनंदन
इस्त्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

सकाळी - ७.४७ वाजता
बंगळुरु : अंतराळ मोहीमेच्या इतिहासात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सुवर्ण अक्षरात नोंद करत पहिल्याच प्रयत्नात मंगळयान मोहीम यशस्वी केली. सकाळी ७.४५ वाजता सुमारास मंगळयानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश केला आणि मंगळ मोहीम फत्ते झाली. यामुळे इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. 

सकाळी - ७.४६ वाजता
मंगळयान इंजिन सुरु
मंगळयान मंगळाच्या कक्षेत स्तानापन्न

सकाळी - ७.४५ वाजता
७.४५ मंगळाच्या कक्षेत स्थिरावले

सकाळी - ७.१० वाजता
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या नियंत्रण कक्षेत

नवी दिल्ली : राज्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणात रेड प्लॅनेट मंगळाकडून गुडन्यूज आली आहे. मंगळयान आज 24 सप्टेंबरला मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे. मंगळयानाच्या मुख्य लिक्विड इंजिनाची चाचणी यशस्वी झाली आणि आज सकाळी ७.२१ मिनिटांनी मंगळयान मंगळग्रहावर पोहणार आहे. ते 7.45 वाजता मंगळाच्या कक्षेत स्थिरावणार आहे. हे भारताचे मोठे यश आहे. जगातील मोजक्यात देशांमध्ये पंक्तित भारत जाऊन बसला आहे.

तब्बल 300 दिवस बंद स्थितीत असलेलं हे इंजिन पृथ्वीवरच्या कंट्रोल रूममधून सुरू करण्यात इस्रोच्या शास्त्रज्ञांना यश आले. तब्बल 4 सेकंदांसाठी हे इंजिन सुरू राहिलं. इंजिन सुरू होत असल्यामुळे आता बुधवारचा मंगळयानाचा मंगळ कक्षेतला प्रवेश शक्य होणार आहे. या यानानं 65 कोटी किलोमीटरचा म्हणजे जवळजवळ 99 टक्के प्रवास पूर्ण केलाय.

मंगळ ग्रह आणि पृथ्वी यामधील अंतर 21 कोटी किलोमीटर असलं तरी गुरूत्वाकर्षणाचा वापर करून हे यान मंगळाकडे जात असल्यामुळे हे अंतर कैक पटींनी वाढलंय.

मिशन मंगळ 
* मंगळ ग्रहाकडून आली 'मंगल'वार्ता !
* लिक्विड इंजिनाची यशस्वी चाचणी
* 300 दिवस बंद असलेलं इंजिन 'फिट' !
* बुधवारी 'मंगळयाना'चा कक्षेत प्रवेश
* 'इस्रो'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
* मंगळ यान आणि मंगळ ग्रह यातील अंतर 40 लाख किमीहून कमी 
* या क्षणी मंगळयानाहून पृथ्वीवर संकेत पोहचण्यासाठी जवळपास 12 मिनिटे लागतायत

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.