‘तो’ 25 दिवस झोपला भावाच्या प्रेतासोबत

मेरठमध्ये एक मुलगा आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत जवळपास 25 दिवस राहिला, झोपला. तो पूर्णपणे नैराश्याच्या छायेत आहे. 

Updated: Sep 7, 2014, 01:18 PM IST
‘तो’ 25 दिवस झोपला भावाच्या प्रेतासोबत title=
हेच ते घर जिथं मृतदेह सापडला

मेरठ: मेरठमध्ये एक मुलगा आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रेतासोबत जवळपास 25 दिवस राहिला, झोपला. तो पूर्णपणे नैराश्याच्या छायेत आहे. 

एकटेपणामुळं नैराश्य आणि नंतर मानसिक संतुलन बिघडल्यामुळं एक धक्कादायक घटना शनिवारी रात्री मेरठमध्ये उघडकीस आली. मेरठच्या शास्त्रीनंगरच्या पॉश कॉलनीमध्ये दोन भाऊ सोबत राहत होते. यातील एका भावाचा मृत्यू जवळपास 20-25 दिवसांपूर्वी झाला. मात्र छोटा भाऊ त्याच्या प्रेतासोबतच झोपत राहिला. त्यानं घर आतून बंद केलं. मात्र असह्य दुर्गंधीनंतर शेजाऱ्यांनी शनिवारी रात्री पोलिसांना बोलवलं.  

पोलिसांनी दरवाजा वाजवला मात्र त्यानं तो उघडला नाही म्हणून मग पोलिसांनी दार तोडलं. आत गेल्यानंतर त्यांनी जे पाहिलं ते भयंकर होतं. प्रेत पूर्णपणे सडलं होतं. सडून त्याचे पाय वेगळे झाले होते. खूप दुर्गंधी पसरली होती. मात्र तरीही छोटा भाऊ त्याच्याजवळ झोपला होता.  

मृत डॉक्टरचं नाव हरीश बगई आहे. अजून छोट्या भावाचं नाव कळलं नाही. त्यानं पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. शेजाऱ्यांनी जितकं सांगितलं तितकंच. पोलिसांचं म्हणणं आहे की, हे प्रेत जवळपास 20-25 दिवस जूनं आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही भावांची मानसिक स्थिती योग्य नव्हती. एक भाऊ तर रस्त्यावरचे पॉलिथिन गोळा करायचा. त्यांची बहिण सुद्धा काही दिवसांपूर्वी त्यांच्यासोबत राहायची. 

तिचा पण मृत्यू झाला होता आणि तिचा मृतदेह सुद्धा अनेक दिवस असाच पडून होता. 
शेजारी बृजेश कुमारनं सांगितलं, हे दोन भाऊ कॉलनीमध्ये सर्वात आधी राहायला आले होते... 1975मध्ये. डॉक्टर साहेब ज्यांचा मृत्यू झाला, ते कॉलनीमध्ये पॉलिथिन उचलत राहायचे. पोलिसांनी सांगितलं, त्याच्या घरात जवळपास 1 ट्रक पॉलिथिन पडले असतील. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.