महाराष्ट्र सदन गैरसोयींवर मार्ग काढा - अशोक चव्हाण

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकास निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. 

Updated: Jul 23, 2014, 04:05 PM IST
महाराष्ट्र सदन गैरसोयींवर मार्ग काढा - अशोक चव्हाण title=

 नवी दिल्ली : शिवसेना खासदारांनी केलेला प्रकास निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय.

एका बाजूला आरोप-प्रत्यारोपांचा प्रकार घडत असला तरी महाराष्ट्र सदनातले निवासी आयुक्त बिपीन मलिक यांच्या मुजोरीचं काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयी, महाराष्ट्रातील खासदारांना डावलून परप्रांतातील खासदारांना झुकतं माप या सगळ्यांविरुद्ध शिवसेनेच्या खासदारांनी आवाज उठवला होता. तरीही मलिक यांची मुजोरी कायमच आहे.

महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांनाच एक आयएएस अधिकारी ऐकेनासा झालाय. मुळ मुद्दा हा मलिक यांच्या मुजोरीचा आहे. महाराष्ट्र सदनाचा कारभार सुधारणे हा मुळ मुद्दा आहे. त्याकडे दुर्लक्ष होऊ नये. महाराष्ट्र सदन वादाप्रकरणातले शिवसेनेच्या खासदारांवर होत असलेले आरोप चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय.

शिवसेनेनं कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसून आंदोलन करत असल्यामुळेच हा कांगावा केला जात असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. महाराष्ट्र सदनात घडलेल्या प्रकाराला जाणिवपूर्वक धार्मिक रंग देऊन राजकारण केलं जात असल्याचा आरोप शिवसेना खासदारांनी केलाय. भाजपनंही याप्रकरणात शिवसेनेची पाठराखण केलीय. 

शिवसेना खासदारांनी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातल्या मुस्लिम केटरिंग सुपरवायजरला रमजान सुरू असताना चपाती खाऊ घातल्याच्या प्रकरणारे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटलेत. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी शिवसेनेच्या दोषी खासदारांवर कारवाई करण्याची मागणी करत जोरदार गोंधळ घातला. त्यामुळं दोन्ही सभागृहाचं कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं. 

काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, जेडीयू आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध केला. तर दोषी खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केली. तर या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राजकारण करण्यात येत असल्याचा दावा करत शिवसेनेनं आरोप फेटाळले आहेत. यावेळी हैदराबादचे आयएमआयए खासदार असादउद्दीन ओवेसी आणि भाजपचे खासदार रमेश विदुरी एकमेकांवर धावून गेले. त्यामुळं गोंधळात आणखीनच भर पडली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.