व्हीआरएस घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार नाही

सरकारी कर्मचाऱ्याने स्वत: नोकरी सोडली तर त्याला पेंन्शनचा अधिकार असणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. 

Updated: Apr 28, 2015, 07:19 PM IST
व्हीआरएस घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार नाही title=

चेन्नई : सरकारी कर्मचाऱ्याने स्वत: नोकरी सोडली तर त्याला पेंन्शनचा अधिकार असणार नाही, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. 

 

व्यापार कर विभागाच्या एका ज्युनिअर असिस्टंटची याचिका फेटाळत खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. त्याने 1978मध्ये राजीनामा दिला होता आणि मासिक पेन्शन मिळावी यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

 
न्यायाधीश एस. विद्यानाथन यांनी आदेश देत सांगितले की, याचिकाकर्त्याने स्वत: नोकरीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे याचिकेत मागितलेल्या पेन्शना त्याला अधिकार नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.