नवी दिल्ली : लालकृष्ण अडवाणी हे आणीबाणी विषयी जे बोलले तो संदेश मोदींसाठी नाही, असं स्पष्टीकरण संघाने दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा.गो.वैद्य यांनी अडवाणींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलं आहे.
‘लालकृष्ण अडवाणी हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आहेत, भारतीय जनता पक्षाच्या 'मार्गदर्शक मंडळा'मध्ये ते आहेत. त्यामुळे ते मोदींशी प्रत्यक्ष बोलू शकतात, अडवाणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही संदेश द्यावयाचा असेल, असे मला वाटत नाही' असं मा.गो. वैद्य यांनी म्हटलं आहे.
देशात पुन्हा आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं होतं यावर मा.गो.वैद्य यांनी हे वक्तव्य केलं आहे.
अडवाणी यांनी 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं होतं.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीला २५ जून रोजी ४० वर्षे पूर्ण होत आहेत. १९७५ ते ७७ या दरम्यान भारतात अणीबाणी होती. या पार्श्वभूमीवर अडवाणी यांनी आपलं मत व्यक्त केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.