www.24taas.com, जयपूर
महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्याचा फास आवळण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महिलांवर बंधने घालण्याचे फतवेही पंचायतींकडून काढले जात आहेत. राजस्थानमधील एका खाप पंचायतीने मुस्लिम मुलींनी मोबाइलवर बोलू नये आणि विवाह सोहळ्यामध्ये नाचू नये असे अजब फतवे काढले आहेत.
उदयपूरपासून ७० किलोमिटर अंतरावर असणाऱ्या साळूंबर येथील अंजुमन मुस्लिम पंचायतीने हा फतवा काढला आहे. पंचायतीचे सचिव हबिबुल रहमान यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले , ` मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलींवर बंधने घालण्याची गरज आहे.
मुलींना मोबाइलवर बोलण्यास बंदी घालण्याची गरज आहे. आपल्या आई-वडिलांसोबत असताना मोबाइल वापरण्यास काहीच हरकत नाही. मात्र , शाळा आणिकॉलेजमध्ये जाताना मोबाइल वापरण्यावर बंदी हवी. शाळा , कॉलेजमध्ये मोबाइल वापरल्यामुळे मुलींची मुलांशी असणारी जवळीक वाढते.