नवी दिल्ली : काश्मीरचा प्रश्न जोपर्यंत निकाली लागत नाही. तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारणार नाहीत अशी आक्रमक प्रतिक्रिया हुरिर्यत नेते सय्यद गिलानी यांनी दिलीय.
काश्मीरमधील फुटीरवादी नेत्यांशी पाकिस्ताननं चालवलेल्य़ा चर्चेमुळे भारतानं पुढील आठवड्यात होणारी दोन्ही देशातील परराष्ट्र सचिव पातळीवरील बैठक रद्द केलीय. यावर पाकिस्ताननंही भारताचा निर्णय दुर्देवी असल्याचं म्हटलंय.
भारताशी चर्चा करण्यापूर्वी काश्मीर नेत्यांशी चर्चा करण्याची पद्धत पंरपरेला धरून असल्याचं आपल्या निवेदनात म्हटलंय. जम्मू-काश्मीरचा प्रश्न सुटावा यासाठी भारत सरकार कोणतेही प्रयत्न करत नाही. हा भारताला हा प्रश्न सुटावा असेही वाटत नाही. भारत फक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असेही गिलानी म्हणाले.
दरम्यान, पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासीत यांनी दिल्लीतील पाक वकिलातीत काश्मिरी फुटीरतावाद्यांना चर्चेसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ भारताने येत्या 25 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या दोन्ही देशांतील परराष्ट्र सचिवस्तरीय वाटाघाटी रद्द केल्या आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.