सिद्धरामय्याने बीफ खाल्ले तर मुंडकं छाटू : भाजप नेता

देशभरात बीफवर वाद थांबताना दिसत नाही आहे. आता आणखी एका वादाला हवा देत एका भाजपच्या नेत्याने म्हटले आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बीफ खाल्ले तर त्यांचे मुंडके धडापासून वेगळे केले जाईल. 

Updated: Nov 3, 2015, 09:54 PM IST
सिद्धरामय्याने बीफ खाल्ले तर मुंडकं छाटू : भाजप नेता title=

शिमोगा : देशभरात बीफवर वाद थांबताना दिसत नाही आहे. आता आणखी एका वादाला हवा देत एका भाजपच्या नेत्याने म्हटले आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बीफ खाल्ले तर त्यांचे मुंडके धडापासून वेगळे केले जाईल. 

एका सार्वजनिक सभेत भाषण करताना भाजपचे नेता आणि शिमोगाचे माजी आमदार एसएन चन्नाबसप्पा यांनी सिद्धरामय्या यांनी धमकी दिली की, त्यांच्यात हिम्मत असेत तर शहरातील गोपी चौकात येऊन बीफ खाऊन दाखवा. 

सीएमने कधी गोहत्या केली आहे का, सार्वजनिक जीवनात ते बीफ खाण्याबद्दल कसे बोलू शकतात. सीएमने बीफ खाल्ले तर त्याचे मुंडके धडापासून वेगळे केले जाईल. 

बसप्पा म्हणाले, बीफ खाण्याबद्दल बोलून सिद्धरामय्या यांनी हिंदूंच्या भावनांचा अपमान केले आहे. मला कोणाची भीती नाही. सिद्धरामय्या यांनी बीफ खाण्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर बसप्पा यांनी धमकी दिली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.