नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आरएसएसला दोषी मानत नव्हते, मात्र आरएसएसला सांप्रदायिक विष पसरवण्यास दोषी मानत होते.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लिहलेल्या पत्रात हा उल्लेख आहे, हे पत्र २७ फेब्रुवारी १९४८ मध्ये लिहण्यात आलं आहे. गांधीजींच्या हत्येनंतर एका महिन्याने हे पत्र लिहण्यात आलं आहे.
पत्रात त्यांनी लिहलं होतं, गांधीजींच्या हत्या प्रकरणात आरएसएसचा संबंध नाही. मात्र दाक्षिणात्य कट्टर संघटना हिंदू महासभेचा समावेश होता, त्यांनी हत्येचा कट रचला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.