भाजपचा मांझी यांना पाठिंबा, बहुमतासाठी अग्निपरीक्षा

बिहार विधानसभेतील घटनेमागे भाजप असल्याचे दिसून येत आहे. भाजपने मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने मतदान करण्यासाठी मांझीनी आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिलेय.

Updated: Feb 20, 2015, 08:25 AM IST
भाजपचा मांझी यांना पाठिंबा,  बहुमतासाठी अग्निपरीक्षा title=

पाटणा : बिहार विधानसभेतील घटनेमागे भाजप असल्याचे दिसून येत आहे. भाजपने मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाच्या बाजुने मतदान करण्यासाठी मांझीनी आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिलेय.

बिहार विधानसभेत आज बहुमत सिद्ध करण्याच्या मांझी यांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मांझी यांनी सार्वजनिक व्यापीठावरून आमदारांना मंत्रिपदाची ऑफर दिली. आमदार मंत्रिपदासाठी नितीशकुमार यांच्या पाठीशी असतील, तर त्यांनी माझ्याकडे यावे, मी त्यांना मंत्रिपद देतो, असे मांझी म्हणाले. 

गरीब स्वाभिमान संमेलनात मांझी यांनी उपस्थितांना आवाहन केले. मंत्री बनण्यासाठी ते माझ्या विरोधात गेले, तर माझ्याकडेही अशा प्रकारच्या अनेक रिक्त जागा असल्याचे त्यांना सांगा. मीसुद्धा त्यांना मंत्री बनवितो. मी गरिबांसाठी काही प्रमाणात का होईना काम केले आहे आणि विरोधक मला हटवित आहेत. थोडासा संयम ठेवा. मी तुमच्यासाठी खूप काही करेन, असे भावनिक आवाहन मांझी यांनी केलेय.

दरम्यान, नितीशकुमार यांना बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे मांझी यांना आपले बहुमत सिद्ध करताना नाकीनऊ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी खुलेआम आमदारांना मंत्रीपदाची ऑफर दिल्याचे दिसत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

Tags: