'पतीचे अनैतिक संबंध मानसिक छळाचे कारण होऊ शकत नाही'

गुजरातमधील एका याचिकेदरम्यान, पतीचे अनैतिक संबंध हे मानसिक छळाचे अथवा आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

Updated: Feb 19, 2015, 08:01 PM IST
'पतीचे अनैतिक संबंध मानसिक छळाचे कारण होऊ शकत नाही' title=

नवी दिल्ली : गुजरातमधील एका याचिकेदरम्यान, पतीचे अनैतिक संबंध हे मानसिक छळाचे अथवा आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

गुजरातमधील एका दांपत्यामध्ये पतीच्या अनैतिक संबंधावरून भांडण होते होते. दोघांनी घटस्फोट घेण्याचे ठरविले होते. मात्र, घटस्फोटापूर्वीच पत्नीने विष पिऊन आत्महत्या केली. पतीच्या अनैतिक संबंधामुळे आत्महत्या केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. स्थानिक व उच्च न्यायालयाने पतीला दोषी ठरवले होते.

पतीने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. जे. मुखोपाध्याय आणि दीपक मिश्रा यांच्या खंडपिठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. 

पतीच्या अनैतिक संबंधामुळे आलेल्या नैराश्‍यातून पत्नीने आत्महत्या केली. मात्र, यामुळे आरोपी आयपीसीतील कलम 498 (अ) अंतर्गत दोषी ठरू शकत नाही. शिवाय, अनैतिक संबंधांचे काही पुरावे आहेत व ते सिद्ध झाले तरी याचिकाकर्ता कलम 498 (अ) अंतर्गत मानसिक छळ केल्याप्रकरणी दोषी ठरू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.