सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही जलाईकट्टूचं आयोजन

जलाईकट्टू खेळाच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासला गेलाय.

Updated: Jan 15, 2017, 05:46 PM IST
सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीनंतरही जलाईकट्टूचं आयोजन   title=

चेन्नई : जलाईकट्टू खेळाच्या संदर्भात तामिळनाडूमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाच हरताळ फासला गेलाय. सर्वोच्च न्यायालयाची मनाई असतानाही पलामेडू गावात जलाईकट्टू नावाच्या बैलांच्या खेळाचं आयोजन करण्यात आलं. पोंगल निमित्तानं तामिळनाडूत बैलांचा जलाईकट्टू हा खेळ खेळला जातो.

या खेळावर 2014 मध्ये बंदी घालण्यात आली. ही बंदी उठवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायलयानं शुक्रवारी ही बंदी उठवण्याबाबत लगेच निर्णय द्यायला नकार दिला होता. त्या पार्श्वभूमीवर आज कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र पलामेडू गावात जलाईकट्टू खेळला गेला.