नवज्योतसिंग सिद्धू यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भाजपमधून बाहेर पडलेले माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झालेत. नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. 

Updated: Jan 15, 2017, 04:16 PM IST
नवज्योतसिंग सिद्धू यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश title=

नवी दिल्ली : भाजपमधून बाहेर पडलेले माजी क्रिकेटर नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेसमध्ये दाखल झालेत. नवी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला. 

पंजाबमध्ये निवडणुका जाहीर झाल्या असताना सिद्धू काँग्रेसमध्ये आल्यामुळे कॅप्टर अमरिंदर सिंग यांचे हात अधिक बळकट झाल्याचं मानलं जातंय. सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांनी नोव्हेंबरमध्येच काँग्रेस प्रवेश केला होता. 

त्यानंतर सिद्धूही त्याच वाटेवर असल्याची चर्चा होती. भाजपशी काडीमोड झाल्यानंतर आवाझ-ए-पंजाब या नावानं सिद्धू यांनी नवी आघाडी स्थापन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र अखेर त्यांनी काँग्रेसचीच वाट चोखाळणं पसंत केलंय.