नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्याकडून येत्या मार्च महिन्यार्यंत देशभरात १००० ठिकाणी एटीएम सेवा सुरू करणार आहे. तसेच सर्व डाकघरांमध्ये कोअर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस्) सेवा सुरू करण्याचाही सरकारचा मानस आहे.
सध्या साधारणतः १२,४४१ विभागीय डाकघरांमध्ये ही सेवा सुरू आहे तर ३०० ठिकाणी एटीएम सुविधा सुरू झाली आहे. यामुळे आता कोअर बँकिंगप्रमाणेच कोणत्याही डाकघरात ग्राहकाचे खाते असेल तरीही इतर कोणत्याही ठिकाणाहून व्यवहार करणे शक्य होणार आहे.
२०१७ सालापर्यंत सर्व १,३०,००० डाकघरांमध्ये सौरउर्जेवर चालणारी बायोमेट्रीक उपकरणे बसविण्याचीही डाकविभागाची योजना आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत २०,००० ग्रामीण डाक घरांत ही उपकरणे बसवली जाण्याची शक्यता आहे.