संसदेचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून

एनडीए सरकारच्या संसदेच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणाचे उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय

Updated: Nov 24, 2014, 12:09 PM IST
संसदेचं हिवाळी अधिवेशनाला आजपासून title=

नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या संसदेच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशनाप्रमाणाचे उपयुक्त ठरेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय

हे अधिवेशन २३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान फक्त २२ बैठका होणार असून आहेत, त्यातील चार दिवस बिगर सरकारी कामकाजासाठी निर्धारित करण्यात आलेत.

या अधिवेशनात सरकार सुमारे ३९ विधेयकं सादर करण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काल अधिवेशनाचा अजेंडा ठरवण्यासाठी एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर तृणमूल काँग्रेसने बहिष्कार घातला. 

तृणमूलच्या खासदाराला शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ हा बहिष्कार घालण्यात आला.या बैठकीत संसदेसमोर या अधिवेशनात असणाऱ्या महत्वाच्या विधेयकांविषयीही चर्चा झाली. 

विमा क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचं विधेयक याच अधिवेशात मांडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण या विधेयकाला सपा, बसपा, डावे पक्ष आणि जेडीयू विरोध करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.