www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
वेळेचं अन्न मिळत नसताना भारतातील श्रीमंत आणि भ्रष्टाचारी लोक हे भारतातून काळा पैसा परदेशात बरोबर पाठवत आहेत. आता ही आकडेवारी अब्जच्या घरात जाऊन पोहचली आहे. भारतातून २००२ ते २०११ या काळात तब्बल ३४३.०४ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा परदेशात गुंतविण्यात आला असून भारताचा जगात पाचवा क्रमांक असल्याचं इथल्या ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटी (जीएफआय) या संस्थेच्या अहवालात म्हटलंय.
वॉशिंग्टनमधील जीएफआयनं ‘विकसनशील देशातील काळ्या पैशाचा प्रवाह २००२-२०११’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गुन्हे, भ्रष्टाचार आणि करबुडवेगिरीतून विकसनशील जगातून २०११ साली तब्बल ९४६.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका काळा पैसा देशाबाहेर गुंतविण्यात आला. तत्पूर्वी २०१० मध्ये ८३२.४ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका काळा पैसा देशाबाहेर लोकांनी पाठविला होता.
विकसनशील देशातून २००२ ते २०११ या कालावधीत ५.९ ट्रीलीयन (खर्व) अमेरिकन डॉलर्स इतका काळा पैसा विदेशात धाडण्यात आला. विशेष म्हणजे देशात मंदी आणि विकास दर घटला असताना श्रीमंत आणि विकसनशील देशातून अनेक ट्रीलीयन डॉलर्सचा काळा पैसा अनामिक कंपन्यात गुंतविण्यात आला.
काळा पैसा विदेशात धाडण्यात चीनचा पहिला क्रमांक २००२ ते २०११ या काळात चीनमधून १.०८ ट्रीलीयन (खर्व) डॉलर्स इतका काळा पैसा विदेशात धाडण्यात आला.
रशियातून ८८०.९६ अब्ज डॉलर्स, मेक्सिकोतून ४६१.८६ अब्ज डॉलर्स तर मलेशियातून ३७०.३८ अब्ज डॉलर्स इतका काळा पैसा विदेशात गुंतविण्यात आला.
विकसनशील देशातून दर वर्षी परदेशात गुंतवल्या जाणार्या२ काळ्या पैशाच्या रकमेत १० टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळं जीडीपीमध्ये घट होत आहे.
विकसनशील देशातून २००२ ते २०११ या कालावधीत ५.९ ट्रिलीयन डॉलर्स इतका काळा पैसा विदेशात गेला.
परदेशात काळा पैसा विदेशात पाठविणार्यात १५ प्रमुख देशांमध्ये आशियातील चीन, मलेशिया, भारत, इंडोनेशिया, थायलंड आणि फिलीपाईन्स, आफ्रिकेतील नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका, युरोपातील रशिया, बेलारुस, पोलंड आणि सर्बिया, तर लॅटीन अमेरिका खंडातील मेक्सिको आणि ब्राझील, तर आखातातील इराक या देशांचा समावेश आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.