'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश'

'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय. 

Updated: Sep 25, 2015, 10:41 PM IST
'भारतच पाकिस्तानवर नियंत्रण ठेवणारा एकमेव देश' title=

नवी दिल्ली : 'भारत हा एकमेव असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण ठेवू शकतो'... अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवारसाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रंप यांनी हे वक्तव्य केलंय. 

दहशतवादाविरुद्ध लढताना अमेरिकेला भारताची साथ घ्यावीच लागेल असं ट्रंप यांनी म्हटलंय. 

रिपब्लिकन पार्टीकडून राष्ट्रपतीपदाचे संभावित उमेदवार ट्रंप यांनी एका रेडिओ कार्यक्रमादरम्यान हे वक्तव्य केलंय. 

'आजच्या तारखेला पाकिस्तान हा जगातील संभावित सर्वात धोकादायक देश आहे... आणि भारत हा एकमात्र असा देश आहे जो पाकिस्तानवर नियंत्रण मिळवू शकतो' असं ट्रंप यांनी म्हटलंय. पाकिस्तान ही एक गंभीर समस्या आहे कारण त्यांच्याकडे अण्वस्र आहेत, असंही त्यांनी म्हटलंय. 

यावेळी, ट्रंप यांनी पाकिस्तानची तुलना उत्तर कोरियाशीही केलीय. ट्रंप यांनी पाकिस्तानचा कथित अपमान करताना म्हटलंय, दहशतवादाविरुद्ध तुम्हाला भारताला सोबत घ्यावंच लागेल. भारताकडे अण्वस्र आणि मजबूत सेना आहे. केवळ भारतच पाकिस्तानला नियंत्रित करू शकतो. पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी आपल्याला भारतासोबत काम करायला लागेल, असं ट्रंप यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.