कैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी

 नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते. 

Updated: Sep 25, 2015, 04:42 PM IST
कैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी title=

नवी दिल्ली :  नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते. 

अधिक वाचा : नेताजींनी चेक गणराज्यच्या महिलेसोबत सुद्धा लग्न केलं होतं?

१४ जानेवारी १९५२ ला मकर संक्रातीला नेताजी सुभाष चंद्र बोस सारदानंद बनून कैथी गावातील गुहांमध्ये आले होते. त्या ठिकाणी त्यांनी बराच काळ घालविला. बातम्यांनुसार या ठिकाणी नेताजी यांच्यासाठी नियमितपणे इंग्रजी वर्तमानपत्र अमृतबाजार पत्रिका पाठविण्यात येत होता. नेताजींच्या राहण्याची व्यवस्था कृष्णकांत पांडेय यांनी केली होती. कृष्णकांत यांनी नेताजींच्या हालचाली संदर्भात एक दस्ताऐवज म्हणून डायरी लिहिली होती. 

अधिक वाचा : व्हिडिओ: नेताजींना काँग्रेसमधून निवृत्त का व्हावं लागलं? - अर्धेंदू बोस

बातम्यांनुसार माजी पूर्व आयबी अधिकारी आणि कृष्णकांत यांचे पूत्र श्यामाचरण पांड्ये यांनी या वर्षी जूनमध्ये सर्व पुराव्यांसह याची माहिती दिली आहे. त्यांना वाटत होतं की सरकारने या पुराव्याच्या आधारावर जाहीर करावं की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नव्हता. पश्चिम बंगाल सरकारने काही फाइल्स सार्वजनिक केल्यानंतर श्यामचरण यांनी यावर मोहर लावली होती. 

अधिक वाचा : नेताजींच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? मृत्यूबाबतच्या 64 फाईल्स सार्वजनिक

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.