नवी दिल्ली : फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रासुआ होलांद हे २४ जानेवारीपासून भारत दौऱ्यावर आहेत. प्रजासत्ताक सोहळ्याचे ते मुख्य अतिथी देखील होते. फ्रान्सचे राष्ट्रपती होलांद आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काही गोष्टीत साम्य आहे.
हे दोन्ही नेते मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी चहावाल्याचं काम केलंय, तर होलांद यांनी सुद्धा पिझ्झा बॉय म्हणून काम केलं आहे.
सुरूवातीला धार्मिक असलेले होलांद नंतर नास्तिक झाले, त्यांची आई सामाजिक कार्यकर्त्या होत्या, तर वडिल इएनटी स्पेशालिस्ट होते. एक विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली आणि काही वर्षाच्या मेहनतीनंतर ते या पदापर्यंत पोहोचले.