चेन्नई : अमेरिकेत हिलरी क्लिंटन यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यापासून स्फूर्ती घेऊन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचे ठरविले, असा अफलातून दावा अण्णा द्रमुक पक्षाच्या एका आमदाराने मंगळवारी केला.
अमेरिकेच्या इतिहासात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढविणाऱ्या हिलरी क्लिंटन या पहिल्या महिला आहेत. त्यामुळे पुरुषप्रधान क्षेत्रात स्त्रीने घेतलेली गरुडझेप म्हणून संपूर्ण जगात क्लिंटन यांचे कौतुक होत आहे. पण क्लिंटन यांच्या उमेदवारीमागे 'अम्मा' हेच एकमेव कारण आहे, असे मी गौरवाने नमूद करू इच्छितो, असे असे सत्ताधारी अण्णाद्रमुकचे कन्नूरचे आमदार ए. रामू विधानसभेत म्हणाले,
सत्ताधारी अण्णाद्रमुकचे कन्नूरचे आमदार ए. रामू विधानसभेत पुढे म्हणाले की, हिलरी क्लिंटन याआधी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री असताना जुलै २०११ मध्ये भारत भेटीवर आल्या होत्या. त्यावेळी २० जुलै रोजी चेन्नईत त्यांची आणि मुख्यमंत्री जयललिता यांची तासभर भेट झाली होती.