हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक

पी. एन. सान्याल ६३ वर्षाच्या वृद्धाला शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पी एन सान्यालच्या घरात रशियन युवती आढळून आली आहे. 

Updated: Jul 21, 2016, 01:16 PM IST
हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक title=

नवी दिल्ली : पी. एन. सान्याल ६३ वर्षाच्या वृद्धाला शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पी एन सान्यालच्या घरात रशियन युवती आढळून आली आहे. 

तसेच खासदारांचे खोटे लेटरहेड देखील त्यांना सापडले आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, अनेकांची नावे पुढे येण्याची शक्यता वाढली आहे.

तपासादरम्यान हा 'हाय प्रोफाइल सेक्स' रॅकेट चालवत असल्याची माहिती पुढे आली होती. आयकर विभागाने  दिल्लीच्या सफदरगंज परिसरात २ जुलैला छापा टाकला होता. 

यावेळी सान्याल याच्या घरात १ रशियन युवती आढळून आली होती.  या रॅकेटमध्ये अनेक परदेशी युवतींचा सहभाग असल्याचेही समजते.