गुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर

 गुजरातच्या अहमदाबाद शहर आज पटेल समाजाच्या मेळाव्यानं दुमदुमून गेलंय. २२ वर्षांच्या हार्दिक पटेलच्या नेतृ्त्वात गुजरातमधल्या पटेल समाजाचे लाखो लोक आज आरक्षणच्या आंदोलनासाठी एकत्र आलेत.

Updated: Aug 25, 2015, 07:28 PM IST
गुजरातमधील पटेल समाज आरक्षणासाठी रस्त्यावर title=

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहर आज पटेल समाजाच्या मेळाव्यानं दुमदुमून गेलंय. २२ वर्षांच्या हार्दिक पटेलच्या नेतृ्त्वात गुजरातमधल्या पटेल समाजाचे लाखो लोक आज आरक्षणच्या आंदोलनासाठी एकत्र आलेत.

पाटीदार किंवा पटेल समाजाला ओबीसीमधून २७ टक्के आरक्षणाचं मिळावं यासाठी हार्दीक पटेलनं आंदोलन सुरू केलंय. जर आरक्षण मिळालं नाही, तर आश्वासन दिल्याशिवाय चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचं स्पष्ट केलंय. आजच्या मेळाव्याला २५ लाख लोक जमा होतील असा दावा करण्यात आलाय. प्रत्यक्षात ही संख्या एवढी मोठी नाही. पण किमान दोन ते अडीच लाख लोक मैदानात पसरल्याचं चित्र आहे.

गर्दीत घातपात किंवा इतर कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून तब्बल १३ हजार पोलिस कर्मचारी तैनात आहेत. दरम्यान पटेल समाजाला आरक्षण देणं शक्य नसल्याचं मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आधीच स्पष्ट केलंय. शिवाय सध्याच्या ओबीसी कोट्यातून पटेलांना आरक्षण दिल्यास त्याचा तीव्र विरोध करण्याचा इशारा गुजरातमधल्याच इतर ओबीसी नेत्यांनी म्हटलंय. त्यामुळे २२ वर्षीय हार्दिकनं उभ्या केलेल्या आंदोलनाकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.