दौसा : राजस्थानच्या दौसा जिल्ह्यातील गुर्जर सीमाला येथे अवैध ताबात हटविण्यासाठी पोहचलेल्या अधिकाऱ्यांवर संतप्त गावकऱ्यांनी साप सोडल्याची अजब घटना घडली. यात तहसीलदारांसह अनेक पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारीही सामील होते. सापांना पाहून अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. ज्या गावात अवैध ताबा हटवायचा होता तेथे अनेक गारुडी राहत होते.
या घटनेबाबत एका अधिकाऱ्यांने सांगितले की, आम्ही गावकऱ्यांना यापूर्वी नोटीस जारी केली होती. गावकऱ्यांनी जमीनला लागू असलेल्या भिंतीला लागू पत्राच्या झोपड्या टाकल्या होत्या. आम्ही त्याठिकाणी पोहचलो तेव्हा त्यांनी आमच्या अंगावर साप सोडले. असे काही होईल हे आम्हांला अपेक्षित नव्हते. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून जाणे पसंद केले.
या ठिकाणी राहणारा गारुडी आपल्यासोबत गावकऱ्यांना घेऊन आला होता. मात्र, काही तासांनंतर अधिकारी पुन्हा त्या ठिकाणी गेले आणि गावातील अवैध बांधकाम तोडून टाकले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.