नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर आता एक हजाराच्या नोटा नव्या रंगात आणि नव्या ढंगात येणार आहेत. एक हजार रुपयाच्या या नोटेवर सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक उपाययोजना करण्यात येणार आहेत. केंद्रीय अर्थ सचिव शक्तीकांता दास यांनी ही माहिती दिली आहे.
याबरोबरच 1, 2, 10, 20, 50, आणि 100च्याही नव्या नोटा बाजारात येणार आहेत असंही आज स्पष्ट करण्यात आलं आहे. आजच रिझर्व बँकेनं पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा बाजारात आणल्या आहेत.
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा आजपासून 30 डिसेंबरपर्यंत बँकेत जमा करायच्या आहेत. पाचशे आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा आठ तारखेच्या मध्यरात्रीपासून चलनात वापरण्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत.