खुशखबर! 'यंदा चांगला पाऊस'

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी पावसाबद्दलची आहे. 

Updated: Mar 22, 2015, 01:22 PM IST
खुशखबर! 'यंदा चांगला पाऊस' title=

नवी दिल्ली : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बातमी पावसाबद्दलची आहे. 

स्कायमेट या संस्थेने नोंदलेल्या अंदाजानुसार यावर्षी सरासरीपेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. 
 
स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दुष्काळ किंवा अतिवृष्टी होण्याचीही कोणती चिन्हे दिसत नाहीत. 

अल निनो वादळामुळे 2002, 2004 आणि 2009 साली दुष्काळी  उद्भवली होती. पण यावर्षी अल निनोचा प्रभाव कमी असण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

त्यामुळे सततच्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना स्कायमेटच्या वर्तवलेल्या अंदाजामुळे थोडा तरी दिलासा मिळेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.