लग्नसराईच्या दिवसांतही सोन्याच्या किंमती ढासळल्या...

सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळालीय. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सराफा बाजारात आज सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरून दोन आठवड्यांचा सर्वात खालच्या स्तरावर दाखल झालीय. सध्या, सोन्याची किंमत २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचलीय.

Updated: May 27, 2015, 06:33 PM IST
लग्नसराईच्या दिवसांतही सोन्याच्या किंमती ढासळल्या...  title=

नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळालीय. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सराफा बाजारात आज सोन्याची किंमत १०० रुपयांनी घसरून दोन आठवड्यांचा सर्वात खालच्या स्तरावर दाखल झालीय. सध्या, सोन्याची किंमत २७,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचलीय.

चांदीची किंमतही ५० रुपयांनी घसरून ३८,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर दाखल झालीय. बाजार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेडरल रिझर्व्हद्वारे यंदा अमेरिकन व्याज दरांत वाढ होणार असल्याच्या चर्चेमुळे डॉलरचा भाव वधारल्यानं सोन्याच्या किंमतींवर हा परिणाम पाहायला मिळालाय. 

आंतराराष्ट्रीय किंमतीचा घरगुती बाजारातील किंमतींवर दबाव पाहायला मिळाला. सामान्यत: घरगुती किंमतींवर परिणाम करणाऱ्या सिंगापूर बाजारात सोन्याची किंमत ०.३ टक्क्यांनी घसरून १,१८४.३७ डॉलर प्रति औंसवर पोहचलीय. १२ मे नंतर हा सर्वांत निम्न स्तर आहे. लग्नसराईच्या दिवसांतही दागिने विक्रेत्यांकडची मागणी घटल्याचाही परिणाम किंमतींवर जाणवतोय.  

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोनं ९९.० आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या किंमतीत १००-१०० रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे, अनुक्रमे २७,३५० रुपये आणि २७,२०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद किंमत पोहचलीय. हा स्तर यापूर्वी ६ मे रोजी पाहायला मिळाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.